नांदणीच्या उपसरपंचांचा माजी आ. उल्हास पाटील यांच्या हस्ते सत्कार

0
157

शिरोळ (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्यातील नांदणी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शिवसेनेचे डॉ. सागर पाटील यांची निवड  करण्यात आली. त्यानिमित्त शिवसेनेचे माजी आमदार उल्हास पाटील यांच्या हस्ते  डॉ.पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

शिवसेनेचा उपसरपंच करण्याचा दिलेला शब्द पाळल्याचे उल्हास पाटील यांना  सांगून  गावातील शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक आप्पा नाईक,  अनिल क्षीरसागर, बाबुराव ऐनापुरे,  अमित नलवडे, सर्जेराव चोपडे, मंगेश देसाई,  विकास पाटील आदी उपस्थित होते.