‘तुझ्या बापाला तुरुंगात घातल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही..!

प्रणिती शिंदेंना माजी आमदाराची धमकी..!

0 163

सोलापूर (प्रतिनिधी) : तुझ्या बापाला तुरुंगात घातल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी धमकी ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते आणि माजी आमदार नरसय्या आडम यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार आणि काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांना दिली. सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून प्रणिती शिंदे यांच्या विरोधात आडम मास्तर रिंगणात आहेत. 

आडम म्हणाले की, तुझ्या बापाला तुरुंगात घातल्याशिवाय मी शांत बसणार नाही. जो पंतप्रधानाला सोलापुरात आणू शकतो तो कोणालाही जेलमध्ये घालू शकतो. माझ्यावर १७० केसेस आहेत त्या २०० झाल्याशिवाय गप्प बसणार नाही. हे गुन्हे म्हणजे माझ्यासाठी अलंकार आहेत. नरसय्या आडम यांच्या या वक्तव्यावरून आता राजकीय वाद होण्याची शक्यता आहे.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More