माजी मंत्री शिवतारे यांचा एकनाथ शिंदेंना पाठिंबा

0
40

पुणे (प्रतिनिधी) : पुरंदर विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार आणि मंत्री विजय शिवतारे यांनी शिवसेनेच बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या शिवसेनेच्या आमदारांना पाठिंबा दर्शवला आहे. बुधवारी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

यावेळी शिवतारे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, आजच्या परिस्थितीला संजय राऊत हे जबाबदार आहेत. अवघ्या महाराष्ट्रातील शिवसैनिकांना विचारले तर, शिवसेनेला दावणीला बांधण्याचे काम देखील संजय राऊतांनी केले आहे. ५६ वर्षांची स्वाभिमानी शिवसेना बारामतीच्या वळचळणीला नेऊन उभा करण्याचं काम संजय राऊतांनी केले आहे, आम्ही त्यांचा निषेध करतो. संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिक नाराज असल्याचेही त्यांनी सांगितले.