कोल्हापुरच्या माजी महापौरांचा शिवसेनेत प्रवेश…

0
137

कोल्हापूर (प्रतिनिधी) : माजी नगरसेवक नंदकुमार मोरे आणि त्यांच्या पत्नी माजी महापौर सरिता मोरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना कोल्हापूर जिल्हा संपर्कमंत्री आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. उदय सामंत, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत मोरे यांनी जुना बुधवार पेठ येथे झालेल्या जाहीर सभेत आज (सोमवार) शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी ना. उदय सामंतांनी त्यांना शिवसेनेचा भगवा ध्वज देवून त्यांचे शिवसेनेत स्वागत केले.

यावेळी नंदकुमार मोरे म्हणाले की, सरिता मोरे यांना महापौर करण्यासाठी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी मोलाचे योगदान दिले. याचबरोबर प्रभागातील तरूण मंडळांनी, नागरिकांनी या प्रभागात शिवसेनेतून निवडणूक लढवावी, असा आग्रह धरला आहे. शिवसेनेत काम करताना मिळणाऱ्या संधीचे सोने करून प्रभागाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. यावेळी शिवसेना शिव अल्पसंख्याक सेनेच्या कोल्हापूर जिल्हा समन्वयक पदावर रियाज बागवान यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा ना.  सामंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी शिवसेना शहर प्रमुख रविकिरण इंगवले, सुशील भांदिगरे, निलेश हंकारे, उदय भोसले,  कपिल नाळे, अर्जुन आंबी, संतोष दिंडे, प्रमोद कोळी आदी उपस्थित होते.