शिरोळ (प्रतिनिधी) : माजी मुख्यमंत्री फडणवीस आणि विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज (गुरुवार) शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त भागांचा दौरा केला. तसेच येथील पद्माराजे विद्यालयातील पूरग्रस्त लोकांना भेट दिली.
यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्य शासनाने पूरग्रस्त नागरिक, शेतकऱ्यांना तातडीची मदत करण्याऐवजी निव्वळ नवनवीन घोषणा करीत आहे. पण प्रत्यक्षात घोषणेची कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी नाही. केवळ बैठका करून दौरे करून पूरग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न संपणार नाहीत. त्यांना तातडीची मदत करण्याची आवश्यकता आहे. असा टोला फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांचे नाव न घेता लगावला. तसेच भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे यांनी पूरग्रस्तांना तांदूळ, भाकरी, चपातीसाठी पीठ देण्याची घोषणा केली.
यावेळी आ. चंद्रकांत पाटील, सुरेश हाळवणकर, पृथ्वीराज यादव, माधवराव घाटगे, संजय पाटील, हिंदुराव शेळके, अशोकराव माने,राजवर्धन नाईक-निंबाळकर, नगराध्यक्ष अमरसिंह पाटील,प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, तहसीलदार अपर्णा मोरे, गटविकास अधिकारी शंकर कवितके, नगरसेवक आदी उपस्थित होते.