राज्यातील काँग्रेस नेत्यांच्या कार्यपद्धतीवर माजी मुख्यमंत्री नाराज

0
65

मुंबई (प्रतिनिधी) : अर्थसंकल्पीय अधिशनानंतर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये अंतर्गत वाद होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांच्या कार्यपद्धतीवर आणि प्रदेश काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर  जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे.

महाविकास आघाडी सरकार केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात आहे. तर काँग्रेसने या कायद्याला आधीच विरोध केला आहे. याबाबत कायदा विधिमंडळात मंजूर केला जाणार होता. पण, या अधिवेशनामध्ये कृषी कायद्याबद्दल काहीच निर्णय झालेला नाही. यावर चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केल्याचे समजते. त्याचबरोबर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक, कृषी कायदा दुरूस्ती,  एमपीएससी परीक्षा लांबणीवर टाकणे, या मुद्दयावर चव्हाण यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. तर यावरून काँग्रेस विधिमंडळ गट नेते बाळासाहेब थोरात, प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांचे नाव न घेता चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली आहे.