भाजपच्या माजी केंद्रीय मंत्र्याचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश

0
12

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे माजी खासदार बाबुल सुप्रियो यांनी आज (शनिवार) तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तृणमूलचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांनी त्यांना तृणमूलचे सदस्यत्व दिले आहे. यावेळी खासदार डेरेक ओब्रायन उपस्थित होते. या प्रवेशामुळे पश्चिम बंगालमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल  करताना सुप्रियो यांना डावलेले होते. त्यानंतर त्यांनी राजकारणातून निवृत्तीची घोषणाही फेसबुकवरुन करून सर्वांना आश्चर्यचकित केले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी, बाबुल सुप्रियो यांनी आपण भाजपच्या बड्या नेत्यांना भेटलो होतो, पण त्यांनी त्यांच्या पुढील निर्यणाबाबत अद्याप काहीही सांगितले नाही, असे म्हटले होते. मी भविष्यात काय करणार, हे फक्त वेळच सांगेल, असेही सुप्रियो यांनी त्यावेळी म्हटले होते.