अब्रू वाचवण्यासाठी भाजपच्या माजी मंत्र्यांचा निवडणुकीतून पळपुटेपणा : धनंजय मुंडे

0
159

बीड  (प्रतिनिधी) : बीड जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर  भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी जोरदार टीका केली आहे. पराभवाची अब्रू वाचवण्यासाठी बीड जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपच्या माजी मंत्र्यांचा पळपुटेपणा केला,   अशा शब्दांत  धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर टीकास्त्र सोडले.   

बीड जिल्हा बँकेच्या ८ जागांसाठी आज (शनिवार) निवडणूक होत आहे. या निवडणुकीवर भाजपने बहिष्कार टाकण्याचा निर्णय पंकजा मुंडे यांनी घेतला आहे. यावर  प्रतिक्रिया देताना धनंजय मुंडे यांनी टीका केली आहे.

सहकारमंत्री यांनी जिल्हा बँकेसंदर्भात दिलेल्या  निर्णयाविरोधात माजी मंत्री हायकोर्टापासून ते सुप्रीम कोर्टापर्यंत लढले. हायकोर्टाने सहकारमंत्र्यांनी दिलेला निर्णय कायम ठेवला. हायकोर्टाने दिलेला निर्णय भाजपच्या माजी मंत्र्यांना मान्य झाला नाही. भाजपकडे मतदार जास्त असताना देखील बहिष्कार टाकणे म्हणजे, यांचे मतदार ऐकत नाहीत, असे सिद्ध होत आहे. तसेच निकालाच्या दिवशी जी नामुष्की ओढवणार होती. ती अब्रू वाचविण्यासाठी भाजपने पळपुटेपणापणा केला,  असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.