कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित मागण्याबाबत आज (शुक्रवारी) जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. आपल्या विविध मागण्यांचे निवेदन शिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, कोरोना योद्धा म्हणून काम केलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सेवेची नोंद सेवा पुस्तिकेत करण्यात यावी, मृत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वारसांना अनुकंपा खाली कायम नोकरी देण्यात येऊन शासकीय आर्थिक लाभ मिळावेत, शिक्षक व शिक्षकेतर यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन 2019, अंशदायी परिभाषित निवृत्तीवेतन ऐवजी भविष्य निर्वाह व सेवानिवृत्ती योजना लागू करण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

यावेळी राज्य समन्वयक बी. डी. पाटील, अध्यक्ष बी.एस. खामकर, कार्यवाह सुरेश खोत, उपाध्यक्ष रवी देसाई, अनिल चव्हाण,  संजय चोरमारे, जयसिंग देवकर, सुरेश जत्राटकर, पी.आर.पाटील, प्रशांत चोपडे, सचिन बिडकर आदी उपस्थित होते.