दिलासा : पाच महिन्यांत प्रथमच कोल्हापुरातील कोरोना रुग्णसंख्या शून्यावर…  

0
156

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभरात ३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर गेल्या चोवीस तासात ७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच ९६० जणांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

गगनबावडा तालुक्यातील १, करवीर तालुक्यातील १ आणि इतर जिल्ह्यातील ५ अशा ७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. पाच महिन्यात प्रथमच कोल्हापूर शहरात कोरोना रुग्णांची संख्या शून्य झाली आहे.

एकूण कोरोनाबाधित रुग्ण – ४९, ६९६, डिस्चार्ज – ४७,९३२, उपचारासाठी दाखल रुग्ण – ५२. मृत्यू – १७१२.