नवे पारगाव (प्रतिनिधी) :  अंबप (ता. हातकणंगले) येथील विकासकामांसाठी २० लाखांचा निधी मंजूर केल्याबद्दल ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा सत्कार गणेश संस्था समूहाचे संस्थापक रामकृष्ण लोकरे यांच्या हस्ते करण्यात आला.  यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी भविष्यात अंबपला निधी कमी पडू देणार नसल्याचे सांगितले. येथील इदगाह मैदानासाठी ५ लाख रुपये व अंतर्गत गल्ली बोळातील पेव्हींग ब्लॉगसाठी १५ लाखांच्या निधीची मागणी केली असल्याचे लोकरे यांनी सांगितले.

हातकणंगले विधानसभा मतदार संघातील ग्रामीण भागांचा विकास करण्यासाठी मूलभूत सुविधा उपलब्ध होण्यासाठी २५/१५ तून २० लाखांचा निधी मंजूर झाला असून बसस्थानक ते अतूल चिबडे इमारत पर्यंत डांबरीकरण १५ लाख रुपये, खणीजवळील गल्ली डांबरीकरणासाठी ५ लाख रुपये मिळणार आहेत. २० २०-२१ च्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली असून लवकरच काम सुरु होईल. यासाठी आमदार राजूबाबा आवळे,  राष्ट्रवादीचे युवा नेते नाविद मुश्रीफ, जि. प.  सदस्य युवराज पाटील,  अड. राजवर्धन पाटील, शिवसेनेचे सागर डोंगरे यांचे सहकार्य लाभले.  यावेळी रणजीत निकम, कलंदर सनदे आदी उपस्थित होते.