गडहिंग्लजमध्ये फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ        

0
12

गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन आयोजित स्पर्धेचे उद्घाटन आ. हसन मुश्रीफ यांनी फुटबॉलला किक मारून केले. या फुटबॉल स्पर्धेमध्ये २४ संघांनी सहभाग घेतला आहे.

रुद्राप्पा हत्ती, अप्पासाहेब कोले व शन्मुगम स्मृती चषक गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. १४ व १६ वर्षे अशा दोन गटामध्ये होणाऱ्या या स्पर्धेचे हे अकरावे वर्ष आहे. एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. यावेळी गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष मल्लिकार्जुन बेल्लद यांनी आ. हसन मुश्रीफ यांचे स्वागत केले.

यावेळी असोसिएशनची संचालक सुरेश कोळकी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील- गिजवणेकर, अभिजित चव्हाण, गौस मकानदार, अरविंद बारदेसकर समन्वयक शुभम आजगेकर, प्रवीण पोवार, गुंडेराव पाटील, रश्मीराज देसाई, महेश सलवादे, राहुल शिरकोळे, अमर मांगले यांच्यासह क्रीडा शिक्षक, मार्गदर्शक, खेळाडू व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.