प्रिया बेर्डेपाठोपाठ ‘ही’ मराठी गायिका राष्ट्रवादीत प्रवेश करणार

0
111

मुंबई (प्रतिनिधी) : प्रसिद्ध मराठी गायिका वैशाली माडे  आता  राजकीय सूर काढणार आहे. वैशाली बुधवारी (दि.३१) मुंबईच्या ‘एनसीपी’ कार्यालयात खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहे. याबाबतची माहिती सांस्कृतिक विभाग प्रदेश अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी दिली आहे.

आपल्या गायन शैलीने वैशालीने मराठी सिनेसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. संगीत क्षेत्रात स्वतःचं वेगळं स्थान प्रस्थापित करण्यासाठी वैशालीला खूप संघर्ष करावा लागला. वैशालीने गायिलेलं संजय लीला भंसाळी यांच्या ‘बाजीराव मस्तानी’ सिनेमातील ‘पिंगा’ या गाण्याने तरूणाईला वेड लावले होते. त्यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीत तिची लोकप्रियता वाढली. बिग बॉसच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ती छोट्या पडद्यावर झळकली होती.  दरम्यान, अभिनेत्री आणि दिग्दर्शक प्रिया बेर्डे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यापाठोपाठ आता वैशालीदेखील राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे.