कोल्हापूर शहरातील रस्त्यांच्या विकास कामांबाबत पाठपुरावा सुरु : राजेश क्षीरसागर 

0
14

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानातंर्गत हद्दीमधील रस्ते, गटर, भुयारी मार्ग आणि फुटपाथ करण्याच्या कामांसाठी १७८.९७ कोटींचा प्रकल्प अहवाल सादर करण्यात आला आहे. यासाठी नाम. एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा सुरु असून याला मंजूरी देण्याबाबत शासन सकारात्मक आहे. त्यामुळे येत्या काही कालावधीत हा निधी मंजूर होण्याची शक्यता आहे. याबाबत मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली.

यावेळी राजेश क्षीरसागर म्हणाले की, गेल्या महिन्यात याबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. परंतु, पूरस्थितीमुळे ही बैठक स्थगित करण्यात आली. याबाबत पुन्हा पाठपुरावा सुरु असून या आठवड्यात मंत्रालय स्तरावर बैठक आयोजित करण्याचे आश्वासन नगरविकास मंत्र्यांनी दिले आहेत.

हा निधी मंजूर करण्यास ना. शिंदे सकारात्मक आहेत. या निधीद्वारे कोल्हापूर शहरातील रस्ते, गटर, भुयारी मार्ग आणि फुटपाथ यांचा सुनियोजित विकास करणे शक्य होणार असल्याचे क्षीरसागर म्हणाले.