कोरोना प्रतिबंधाचे नियम पाळू-लॉकडाऊन टाळू : कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स

0
51

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजनेबाबत कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजतर्फे आज (मंगळवार) बैठक घेण्यात आली. यामध्ये कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे पदाधिकारी, संचालक मंडळ आणि सर्व संलग्न संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांची उपस्थिती होती.

या बैठकीमध्ये ‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी’ ही मोहीम कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज व संलग्न संघटनांतर्फे सक्षमपणे पुन्हा एकदा राबविली जाणार आहे. तोंडाला मास्क नाही तर दुकानात प्रवेश नाही, दुकानात योग्य सामाजिक अंतर राखावे, ग्राहक आणि कर्मचाऱ्यांना सॅनिटाईज करावे. या त्रिसुत्रीकरणाचा अवलंब करावा, निर्णय घेण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष शिवाजीराव पोवार, संजय पाटील,  मानद सचिव धनंजय दुग्गे, जयेश ओसवाल, खजानिस हरिभाई पटेल, माजी अध्यक्ष प्रदिपभाई कापडिया यांनी सर्वांना मार्गदर्शन करीत कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या सुचना केल्या.

या बैठकीला, मानद सचिव वैभव सावर्डेकर, संचालक प्रशांत शिंदे, राहूल नष्टे, अजित कोठारी, संपत पाटील, संभाजी पोवार, अनिल धडाम, अविनाश नासिपुडे, शिवानंद पिसे, हितेंद्र पटेल, सिमा शहा, गोशिमाचे अध्यक्ष श्रीकांत पोतनीस, हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष उज्वल नागेशकर, बबन महाजन, संदिप वीर उपस्थित होते.