महामार्गालगत सर्व्हिस रोडवर आले पुराचे पाणी

0
2588

टोप (प्रतिनिधी) : गुरुवारी दुपारी पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या सर्व्हिस रोडवर पुराचे  पाणी आल्याने येथील व्यावसायिक आपल्या वस्तू हलवण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे.

गेले अनेक दिवस सुरु असलेल्या मुसळधार पावसाने पंचगंगेने इशारा पातळी गाठली असून, पंचगंगेची इशारा पातळीकडे वाटचाल सुरु आहे. यामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. सर्व्हिस रोडवर आलेले पुराचे पाणी महामार्गावर येणार का? याची चर्चा सर्वत्र सुरु झाली आहे.

कोल्हापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या या महामार्गावर असणारा सर्व्हिस रोडवर आज (गुरुवार) दुपारपासून पाणी येण्यास सुरु झाले. पाणी महामार्गावर येण्यासाठी थोडेसे अंतर शिल्लक राहिले असल्याने २०२१ ची पुनरावृत्ती होणार का, याची चर्चा होत आहे.