कितीही फडफड करा…! : संजय राऊतांची किरीट सोमय्यांना वॉर्निंग

0
43

मुंबई (प्रतिनिधी) : आमची भूमिका अन्वय नाईक यांच्या पत्नीला न्याय द्यायची आहे. गुन्हेगारांना शिक्षा देण्याची आहे. शेठजीच्या पक्षाच्या प्रवक्त्यांना गुन्हेगारांना वाचवायचं आहे, म्हणून अशी फडफड करत आहेत. त्यांनी कितीही फडफड केली तरी काही निष्पन्न होणार नाही,  अशा बोचऱ्या शब्दांत  शिवसेना खासदार संजय राऊत यांनी  भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर तोफ डागली.  

मराठी माणसाने केलेला व्यवहार यांच्या डोळ्यात खुपतोय का?  म्हणे २१ व्यवहार केले. हा खोटारडेपणाचा कळस आहे. ही त्यांना वॉर्निंग आहे. त्यांनी अशी कितीही फडफड केली, तरी महाराष्ट्राचं सरकार पाच वर्ष चालणार, असे राऊत म्हणाले.

ही निराशा, वैफल्य आहे. एका गुन्हेगाराला भेटण्यासाठी तुम्ही तुरुंगात जाता, आंकांडतांडव करत आहात. कोण लागतो तो तुमचा? ती महिला तुमची कोणी लागत नाही? तिचा नवरा मेला आहे, सासू मेली आहे. ते तुमचे कोणीही लागत नाहीत. हे महाराष्ट्राचे दुश्मन आहेत. हे ढोंगी, भंपक, खोटारडे, बनावट लोक आहेत,  अशा शब्दांत  संजय राऊत यांनी सोमय्या यांच्यावर हल्लाबोल केला.