रांगोळी (प्रतिनिधी) : रांगोळी येथे ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवानिमित्त १३ ते १५ ऑगस्ट रोजी गावातील माजी सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचा निर्धार ग्रामपंचायतीच्या वतीने घेण्यात आला. यावेळी ग्रामपंचयातीने ध्वजारोहणाला उपस्थित राहण्यासाठी माजी सैनिकांना पत्र दिले आहे. या उपक्रमामुळे रांगोळीतील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.