पन्हाळ्यातील मागासवर्गीय कुटूंबाच्या पाणी बिलातील स्थिर आकार माफ

0
53

पन्हाळा (प्रतिनिधी) : पन्हाळा नगरपरिषदेच्या एकूण अर्थसंकल्पा पैकी ५% निधीतून पन्हाळ्यातील, दलीत, मागासवर्गीय, कुटूंबाच्या पाणीबिलामधील अधिभारवरील निधीतून खर्च करण्यासाठी, राष्ट्रीय बहूजन महासंघाच्या अध्यक्ष राजीव सोरटे यांनी समाज बांधवाबरोबर दिलेल्या निवेदनास मानता देऊन ५ टक्के निधीतुन पाणी बिलातील स्थिर आकार माफ केला आहे.

पन्हाळा येथिल समाज बांधव व राष्ट्रिय बहूजन महासंघाच्या वतिने पन्हाळा गिरीस्थान नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा रुपाली धडेल व मुख्याधिकारी यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम पार पडला. पन्हाळा नगरपरिषदेच्या अधिकारी पदाधिकारी यांनी प्रामाणीकपणे केलेल्या कामाबद्दल त्यांचा सत्कार करणेत आला. या सभारंभास सतीश कासे, नंदकुमार कांबळे, आमोल वाडेकर,  अक्षय सोरटे,  रमेश कसे, समीर गवंडी, शीतलकुमार गवंडी, काशीनाथ बुरुड आदी मोठ्या संख्येने सर्व समाजबांधव व राष्ट्रीय बहुजन महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.