महापालिकेवर याआधीही पाचवेळा प्रशासक…

0
89

कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील महापालिकेवर सहाव्यांदा प्रशासकीय राजवट येत आहे. यापूर्वी विविध कारणांमुळे पाचवेळा प्रशासकीय राजवट होती. पण यावेळी प्रशासनराजमध्ये कोरोना महामारी आहे. यावर नियंत्रण ठेवून विविध विकासाची कामे मार्गी लावावी लागणार आहेत.

महापालिका निवडणूक प्रक्रिया मतदानाच्या तारखेआधी ४ ते ६ महिन्यापूर्वी पासून सुरू व्हावी लागते. मतदार यादी तयार करणे, मतदार यादी जाहीर करून ती अंतिम करणे, प्रभागाचे आरक्षण टाकणे अशी कामे करावी लागतात. पण अजूनही प्रत्यक्षात निवडणूक प्रक्रियेलाच सुरूवात झालेली नाही. त्यामुळे महापालिकेवर ६ महिने तरी प्रशासक राहण्याची शक्यता आहे. यापुर्वी १५ डिसेंबर १९७२ नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर झाल्यानंतर पहिल्यांदा व्दारकानाथ कपूर यांची प्रशासक म्हणून नियुक्ती झाली.

ते १५ एप्रिल १९७५ पर्यंत प्रशासक राहिले. १६ एप्रिल १९७५ ते ८ मे १९७७, ७ जुलै १९७७ ते १० जून १९७८, ११ जुलै १९७८ ते १६ ऑगस्ट १९७८ या कालावधीतही प्रशासकांनी कामकाज पाहिले. १९७८ चे शेवटचे प्रशासक डी. टी. जोसेफ हेच पुढे १ ऑगस्ट १९७९ पर्यंत महापालिकेचे पहिले आयुक्त झाले. त्यानंतर पुन्हा ११ एप्रिल १९८४ ते २७ सप्टेंबर १९८६ या कालावधीत शि. ग. भोसले हे प्रशासक होते. सहाव्यांदा प्रशासक म्हणून आयुक्त बलकवडे काम पाहत आहेत.