संदीप मागाडे खून प्रकरणी पाच जणांना पोलीस कोठडी…

0
77

इचलकरंजी (प्रतिनिधी) : कबनूरात राजकीय वैमनस्यातून झालेल्या संदीप मागाडे खून प्रकरणी अटक करण्यात आलेल्या पाच जणांना आज (सोमवार) न्यायालयात हजर केले. यावेळी यांना १ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. मागाडे खून प्रकरणी शिवाजीनगर पोलिसात २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून उर्वरीत संशयितांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.

२३ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास कबनूर येथील संदीप मागाडे याचा निर्घृणपणे खून करण्यात आला. या प्रकरणी कुणाल कांबळे याने दिलेल्या फिर्यादीनुसार वीस जणांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिसांनी संशयितांपैकी मुदस्सर घुणके, राहुल शिंदे, रोहन कुरणे, शाहरुख शेख आणि शाहरुख अत्तार या पाचजणांना अटक केली आहे. या सर्व संशयितांना न्यायालयात हजर केले असता त्यांना एक फेबु्रवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.