नवरात्रोत्सव पहिला दिवस : श्री अंबाबाईची पूजा ‘कुंडलिनी’ स्वरूपात !

कोल्हापूर (प्रतिनिधी) : असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रोत्सवास आजपासून (शनिवार) प्रारंभ झालाय. घटस्थापनेच्या दिवशी श्री अंबाबाईची महापूजा श्री कुंडलिनी रूप पराम्बिकेच्या स्वरुपात बांधण्यात आली आहे.

पराम्बा अर्थात वाणी शब्द याला अनाकलनीय असं भगवतीचं रूप. अशी ही जगदंबा जिने त्रिनेत्र आणि दोन हाताचं रूप धारण करून एका हातामध्ये  रत्नजडित मधुपात्र आणि दुसऱ्या हातात लाल कमळ धारण करणाऱ्या या देवीचा वर्ण हा उगवत्या सूर्याप्रमाणे अर्थात सिंदूरी आहे. डोक्यावर माणकं जडवलेला किरीट आणि चंद्र धारण करणारी सुहास्य वदना अशी ही पराम्बिका रत्नघटावर चरण ठेवून विराजमान आहे. या कुंडलिनी स्वरूपी देवीचे ध्यान ललिता सहस्त्रनाम स्तोत्राचे पठणापूर्वी अवश्य केले जाते. योगी जनांच्या साधनेचा आधार म्हणजे कुंडलिनी जागृती जी सुप्तावस्थेत असते त्यामुळे आपण सर्व भवबंधनात असतो पण मूलाधार चक्रात साडेतीन वेटोळे घालून बसलेली ही पराशक्ती जागी होऊन षट्चक्रांचा भेद करत सहस्त्रार चक्रात पोहोचतो आणि उन्मनी अवस्था रूप अमृताची वृष्टी करते.

सिन्दूरारूण विग्रहां त्रिनयनां माणिक्यमौलि स्फुरत्

तारा नायक शेखरां स्मितमुखी मापीन वक्षोरुहाम् |

पाणिभ्यामलिपूर्ण रत्न चषकं रक्तोत्फलं बिभ्रतीं

सौम्यां रत्न घटस्थ रक्तचरणां ध्यायेत् पराम्बिकाम्

श्रीमातृचरणारविंदस्य दासः प्रसन्न सशक्तीकः

प्रतिपदेला करवीर निवासिनी महाशक्ती कुंडलिनी स्वरुपात स्थानापन्न झालेली आहे. कुंडलिनी हीच आत्मशक्ती निर्माण, पालन आणि संहाराची शक्ती. ही कुंडलिनीच प्राणशक्ती, आधारशक्ती आणि त्यामुळेच परब्रम्हस्वरूपा…

ही पूजा श्रीपूजक माधव मुनीश्वर आणि मकरंद मुनीश्वर यांनी बांधली.

Live Marathi News

Recent Posts

…तर शरद पवारांच्या घरावर मोर्चा ! – मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

नाशिक (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून…

15 hours ago

जिल्ह्यातील लॉकडाऊनची मुदत पुन्हा वाढली…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हयामध्ये लॉकडाऊनची मुदत…

15 hours ago

कळे येथील शिबिरात १४० जणांचे रक्तदान

कळे (प्रतिनिधी) : मुंबईवर २६ जानेवारी…

16 hours ago