कोल्हापूर : येथील अंबाबाई मंदिरात महिला वडाच्या झाडाची पूजा करत असताना अचानक वडाच्या झाडाला आग लागली. यामुळे मंदिरात एकच खळबळ उडाली.
वटपौर्णिमेला महिला वडाच्या झाडाची पूजा करून पतीच्या आरोग्यदायी आणि दीर्घायुष्याची मागणी करतात. शनिवारी वटपौर्णिमेनिमित्त वडाच्या पूजेसाठी कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात महिलांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी वडाच्या झाडाला गुंडाळलेल्या दोऱ्याला आग लागल्यामुळे वडाच्या झाडाला आग लागली.
कापूर आणि अगरबत्ती पेटवल्याने ही आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर सुरक्षा रक्षकांनी तत्काळ धाव घेत आग विझवली. दरम्यान येथे आलेल्या एक महिलेने झाडाजवळ कापूर पेटवला. यामुळे झाडाला गुंडाळलेल्या दोऱ्याने पेट घेतला. या घटनेनंतर सर्व महिलांना झाडाजवळून लांब करण्यात आले.