पंचगंगा साखर कारखाना परिसरातील मजुरांच्या झोपडयांना आग

0
39

इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी येथील देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखाना परिसरातील ऊसतोड मजुरांच्या झोपडयांना आज (गुरूवार)   दुपारच्या सुमारास आग लागली. या आगीत दोन मजुरांच्या झोपडया जळून खाक झाल्या. या आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

या आगीत प्रापंचिक साहित्य, २८ हजारांची रोकड, १ तोळा सोन्याचे दागिने जळून खाक झाले आहेत. तर १ म्हैस आणि २ लहान जनावरे होरपळून ठार झाली आहेत. दरम्यान, प्रसंगावधान दाखवत मजुरांनी इतर झोपड्यांना लागलेली आग विझवली त्यामुळे मोठे संकट टळले आहे.