कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरातील छ. शाहू महाराज रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या एका रेल्वेच्या डब्याला काल (रविवार) रात्री आग लागली. या आगीमध्ये रेल्वेचा डबा जळून खाक झाला. मात्र, या आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट असून सुमारे एक तासाच्या प्रयत्नानंतर ही आग विझवण्यात अगनिशमन दलाला यश आले. यावेळी अग्निशमन दलाने तीन गाड्यांच्या मदतीने ही आग विझवली.