सीपीआरच्या ट्रामा केअर सेंटरला आग : दोन रुग्णांची प्रकृती चिंताजनक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या सीपीआर रुग्णालयातील ट्रामा केअर सेंटरला आज (सोमवार) पहाटे चारच्या सुमारास आग लागली. या घटनेने रुग्ण आणि वैद्यकीय कर्मचारी यांच्यात मोठी खळबळ उडाली. दरम्यान, ट्रामा सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना तात्काळ अन्य ठिकाणी हलवण्यात आले.

ही घटना समजताच प्रशासकीय यंत्रणेची धावपळ उडाली. अग्निशमन दलाचे दोन बंब आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ही आग शॉर्ट सर्किटने लागल्याचे प्राथमिक तपासात सांगितले जाते. दरम्यान शॉर्ट सर्किट झाल्याने सेंटरमधील सर्व व्हेंटिलेटर बंद पडले. ट्रामा सेंटरमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार सुरू होते. अत्यवस्थ रुग्णांना दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आले आहे. एकूणच या घटनेने कोरोना रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये खळबळ उडाली. याप्रसंगी दोन रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. दरम्यान जिल्हाधिकारी दौलत देसाई सीपीआरचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांच्यासह वैद्यकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलाला यश आले असून, रुग्णांना बाहेर काढताना सिपीआरमधील दोन कर्मचारी यांना किरकोळ दुखापत झाली आहे.

Live Marathi News

Recent Posts

बी, सी, डी वॉर्ड-उपनगरात सोमवारी पाणी पुरवठा बंद…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहरातील ए,…

3 mins ago

पणोरे ग्रामस्थांतर्फे शहिदांना आदरांजली…

कळे (प्रतिनिधी) : पाकिस्तानच्या हल्ल्यात शहीद…

36 mins ago

कोल्हापूर कोरोना अपडेट : चोवीस तासांत १० जणांना लागण

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल…

53 mins ago