‘पदवीधर, शिक्षक’साठी ‘येथे’ नाव शोधा

0
133

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघ व्दिवार्षिक निवडणुकीचे मतदान १ डिसेंबर रोजी होणार आहे. जिल्ह्यातील पदवीधर व शिक्षक मतदारांनी मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी  https://kolhapur.gov.in/या संकेतस्थळावर Voter Search हा पर्याय उपलब्ध दिला असल्याची, माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

https://kolhapur.gov.in/या संकेतस्थळावर मतदारांना आपले नांव कोणत्या मतदान केंद्रात सामाविष्ट आहे याची माहिती मिळू शकेल. पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणुकीत लोकशाही बळकट करण्यासाठी सर्व मतदारांनी आपल्या पवित्र मतदानाचा हक्क बजवावा, असेही आवाहन जिल्हाधिकारी देसाई यांनी केले आहे.