जाणून घ्या, रात्रीच्या संचारबंदीचे काय आहेत नियम…

0
351

मुंबई (प्रतिनिधी) : ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या विषाणूच्या प्रादुर्भाव झाला असून अनेकांना त्याची लागण झाली आहे. ब्रिटनमध्ये काही भागांत पुन्हा कडक लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारने सावधगिरीचा पवित्रा घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व महापालिका क्षेत्रात नाईट कर्फ्यू म्हणजे रात्रीची संचारबंदीची घोषणा केली आहे. ही संचारबंदी ५ जानेवारीपर्यंत कायम राहणार आहेत. या काळात संचारबंदीत काय सुरू राहणार आणि काय बंद राहणार, यातील ठळक नियम काय आहेत, ही जाणून घेऊ.

हा कर्फ्यू रात्री ११ ते सकाळी ६ असा सात तासांसाठी असणार आहे.

महाराष्ट्रात युरोपियन देश आणि मिडल इस्टमधून येणाऱ्या प्रवाशांना १४ दिवस क्वारंटाइनमध्ये रहावे लागणार आहे.

भाज्या आणि दुधासारख्या आवश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही.

पाचपेक्षा जास्त जणांना कर्फ्यू दरम्यान ११ ते ६ या वेळात एकत्र येता येणार नाही. रात्री ११ वाजता केमिस्ट व्यतिरिक्त अन्य सर्व दुकाने बंद होतील.

रात्री ११ नंतर अनावश्यक कारणांसाठी प्रवास करता येणार नाही.

२२ डिसेंबर ११.५९ मिनिटांपासून ३१ डिसेंबर ११.५९ पर्यंत ब्रिटनमधून येणारी आणि जाणारी सर्व विमाने बंद राहतील.

ऑफिसेस, टॅक्सी, कार आणि रिक्षा रात्रीच्यावेळी नियमानुसार सुरू राहतील.