मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. त्यामुळे अखेर रविवारी (दि.११)  होणार एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  याबाबत निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह अधिकाऱ्यांची व्हीसीच्या माध्यमातून बैठक झाली. या बैठकीत परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.

आगामी काळात कोरोना परिस्थितीचा अंदाज घेऊन या परीक्षेची नवी तारीख जाहीर करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, एमपीएससीची परीक्षा रद्द करून लांबणीवर टाकण्यात यावी, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आज सकाळी केली होती.