कोल्हापूर (प्रतिनिधी) : मित्राला वही देऊन येतो, असे सांगून काल (बुधवार) दुपारच्या सुमारास सायकलवरून घरातून बाहेर पडलेला अल्पवयीन मुलगा घरी परत आला नाही. त्यामुळे मुलगा बेपत्ता झाल्याची फिर्याद आई अर्चना विश्वास कवठेकर यांनी आज (गुरूवार) लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात दिली होती. परंतु, तो मुलगा जोतिबा इथे आज सापडला.

अनिवरद विश्वास कवठेकर ( वय १५,  रा. सरदार गल्ली, शनिवार पेठ) असे बेपत्ता झालेल्या मुलाचे नांव आहे. तर हा मुलगा अल्पवयीन असल्याने अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा बेपत्ता झालेला मुलगा आज (गुरुवार) जोतिबा डोंगरावर लक्ष्मीपुरी पोलिसांना सापडला. या मुलाने आपल्यासोबत चादर नेली होती. त्या पोलीसांनी अनुषंगाने हद्दीतील विविध बगीचे आणि मंदिरे यांचा परिसर पिंजून काढला. तसेच सोशल मिडीयाचा वापर केल्यामुळे हा मुलगा जोतिबा येथे मिळून आला.