मुंबई (प्रतिनिधी) : परळीतील  पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी शिवसेनेचे नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांचे नाव समोर आले होते. यावरून विरोधी पक्ष भाजपने कारवाईची मागणी लावून धरल्याने शिवसेनेसह ठाकरे सरकारची कोंडी झाली आहे.  या पार्श्वभूमीवर संजय राठोड यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे  दिल्याची माहिती मिळत आहे.

संजय राठोड यांचा राजीनामा निष्पक्ष चौकशीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  स्वीकारला असल्याचे समजते.  शिवसेना  एका मोठ्या नेता आणि कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या मागे खंबीरपणे उभे राहील.  धनंजय मुंडे प्रकरणात त्यांच्याकडून राजीनामा घेतला नाही. तर मग संजय राठोड यांना तरी राजीनामा द्यायला का लावायचं?  असा प्रश्न काही नेत्यांनी उपस्थितीत केला आहे. शिवाय यामुळे वेगवेगळ्या मुद्यांवर विरोधक राजीनामे मागत सुटतील, असा एक मतप्रवाह शिवसेनेत आहे.  दरम्यान, या प्रकऱणात राठोड यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव वाढू लागला होता. अखेर त्यांनी आपला राजीनामा दिला आहे.