मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेनेचे वनमंत्री संजय राठोड यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आज (रविवार) सुपूर्द केला. राठोड यांनी पत्नीसोबत वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपली बाजू मांडली. यावेळी मंत्री एकनाथ शिंदे, अनिल परब, आदित्य ठाकरे आदी प्रमुख नेते उपस्थित होते.

सोमवारपासून राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर राठोड यांच्यावर राजीनामा देण्यासाठी पक्षांतर्गंत दबाव वाढला होता. त्याचबरोबर विरोधी पक्षांकडून सातत्याने राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरण्यात आली होती. अखेर राठोड यांनी राजीनामा दिला आहे.