अखेर शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांना अटक  

0
111

नाशिक  (प्रतिनिधी) : नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी वैशाली झनकर  यांना ८ लाख रुपयांची लाच  घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली. त्या एसीबीच्या हातावर तुरी देऊन फरार झाल्या होत्या. त्यांचा  कसून शोध घेतला जात होता. अखेर त्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.  

पोलिसांनी सापळा  रचून वैशाली झनकर यांना ८  लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. मात्र, त्यानंतर त्या फरार झाल्या होत्या.  तीन दिवसांपासून त्यांचा  शोध घेतला जात होता. अखेर त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, वैशाली यांनी आजच वकिलामार्फत अटकपूर्व जामिनासाठी अर्जही केला होता.  त्यामुळे त्यांना जामिन मिळणार का ? हे  पाहणे महत्वाचे ठरणार आहे.