अखेर बँक कर्मचाऱ्यांचा संप मागे

ग्राहकांची गैरसोय टळणार...

0 189

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने १० बँकांचे विलिनिकरण करून ४ मोठ्या बँका करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या विरोधात आणि अन्य विविध मागण्यासाठी बँक कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप अखेर मागे घेण्यात आला आहे. याबाबत काल (सोमवार) या संघटनांची अर्थ विभागाचे सचिव राजीव कुमार यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीत संप मागे घेण्यात आल्याची माहिती संघटनांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

बँक कर्मचाऱ्यांच्या चार संघटनांनी संपाचा इशारा दिला होता. चौथा शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवसांना जोडून हा संप पुकारण्यात आल्यानं बँकेचे कामकाज चार दिवस ठप्प राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉनफेडरेशन (AIBOC), ऑल इंडिया बँक आफिसर्स असोसिएशन (AIBOA), इंडियन नॅशनल बँक ऑफिसर्स काँग्रेस (INBOC) आणि नॅशनल ऑर्गेनायझेशन ऑफ बँक ऑफिसर्स (NOBO) या संघटनांनी संपाची घोषणा केली होती. परंतु आता संप मागे घेण्यात आल्यामुळे ग्राहकांची गैरसोय टळणार आहे.

बँकांचे विलिनिकरण करण्यात येऊ नये, तसंच पाच दिवसांचा आठवडा करण्यात यावा, रोख व्यवहारांची वेळ कमी करावी, अशा विविध मागण्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात आल्या होत्या. सरकारने १० बँकांचे विलिनिकरण करून चार बँका करण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत युनायटेड बँक ऑफ इंडिया आणि ओरिएंटल बँकेचे पीएनबी बँकेत विलिनिकरण होणार आहे. तर सिडिकेट बँकचे कॅनरा बँकेत, अलाहाबाद बँकेचे इंडियन बँकेत आणि आंध्रा बँक आणि कॉर्पोरेशन बँकचे युनियन बँकेत विलिनिकरण करण्यात येणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More