कपिलेश्वर (प्रतिनिधी) : राधानगरी तालुक्यातील कपिलेश्वर येथे काडर्सिद्धेश्वर महाराज यांच्या जीवनावरील चित्रपटाचे चित्रीकरण पार पडले.

कपिलेश्वर येथील प्राथमिक शाळेमध्ये मुंबई येथील शुभम फिल्म निर्मित काडसिद्धेश्वर महाराज यांच्या जीवनावरील सोहम या चित्रपटाचे चित्रीकरण पार पडले. चित्रीकरणांमध्ये शहरामध्ये मुले राहिल्याने गावाकडील रुढी, परंपरा, संस्कार काय असतात या भागाचे चित्रीकरण पार पडले.

यामध्ये प्रमुख कलाकर सोनियाची पावले फेम ज्योती नेमसे, सुहास फणसीकर, नवीन प्रभाकर, बालकलाकार आघा लोंढे, प्राथमिक, माध्यमिक, शिक्षक ,शिक्षिका गावातील नागरिकांनी, शाळेतील विद्यार्थ्यांनी चित्रीकरणांमध्ये भाग घेतला.