उपवनसंरक्षक शिवकुमारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : भाजप महिला मोर्चाची मागणी

0
29

कोल्हापूर (प्रतिनिधी) : वन विभागातील दीपाली चव्हाण या कर्मचारी महिलेने उप वनसंरक्षक विनोद शिवकुमार यांनी केलेल्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याप्रकरणी शिवकुमार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजप महिला मोर्चाच्या वतीने करण्यात आली. याबाबत आज (शुक्रवार) जिल्हाध्यक्ष गायत्री राऊत यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळातर्फे मुख्य वनसंरक्षक व्ही. सी. बेन यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, दिपाली चव्हाण यांच्यावर सातत्याने विनोद शिवकुमारच्या माध्यमातून अत्याचार व दबाव वाढत असताना त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दिली होती. परंतु वरिष्ठांनी याकडे कानाडोळा केल्यामुळे चव्हाण यांना आत्महत्येचा मार्ग पत्करावा लागला. इतके होऊनही शिवकुमार याला निलंबित करण्यासाठी वन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बराच वेळ घेतला. यामागचे गौडबंगाल काय ? वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे चव्हाण यांनी वेळोवेळी ज्या तक्रारी शिवकुमारबद्दल दिल्या होत्या त्याची आवश्यक ती कागदपत्रे व पुरावे वनविभागाने पोलिसांना देऊन सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणेबाबत जरूर ते प्रयत्न करावेत.  `

या वेळी महिला आघाडीच्या आसावरी जुगदार, विद्या बनछोडे,  स्वाती कदम, शुभांगी चितारे, कविता लाड,  अरुणा घाडगे, कोमल देसाई उपस्थित होत्या.