मुख्यमंत्र्यांवर अवमानकारक टिप्पणी करणाऱ्यावर गुन्हा दाखल करा : इचलकरंजी युवा सेनेची मागणी

0
182

इचलकरंजी (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ‘फेसबुक’वर  या धनाजी पवार याने अत्यंत अश्लील भाषेत टिप्पणी केली आहे. त्याच्यावर कडक कारवाई करून गुन्हा दाखल करावा, या मागणीचे निवेदन आज (शनिवार) इचलकरंजी युवा सेनेतर्फे अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांना देण्यात आले.

या वेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख महादेवआण्णा गौड, शिवसेना शहरप्रमुख सयाजी चव्हाण, शिवाजी पाटील, काशिनाथ बावडेकर, अविनाश वासुदेव, अभिजित लोले, पवन मेटे, सागर जाधव, अमित शिरगुरे, विनायक पोवार, सुनील मंत्याळ व पदाधिकारी उपस्थित होते.