वाळोली येथे पाईपलाईनवरुन मारामारी : चौघांवर गुन्हा

0
346

कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील वाळोली येथे शेतातील सामाईक सिमेंटची पाईपलाईन काढण्याच्या कारणावरून आज (गुरुवार) मारामारी झाली. यामध्ये एकजण जखमी असून चार जणांवर कळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

वाळोली येथील संतोष लक्ष्मण पाटील आणि संजय गणपती पाटील हे भाऊबंद आहेत. त्यांच्यात शेतातील सामाईक सिमेंटच्या पाईपलाईनच्या कारणावरून वाद आहे. या दोघांची एकत्रीत शेती असून जेसीबीच्या सहाय्याने सिमेंट पाईप उकरत असताना संतोष पाटील यांना संजय पाटील यांनी चिव्याच्या काठीने आणि लाथाबुक्यांनी मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे संजय गणपती पाटील, प्रकाश गणपती पाटील, बाजीराव गणपती पाटील, राजाराम गणपती पाटील सर्व (रा. वाळोली) यांच्या विरोधात कळे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.