कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील कळे येथे लॉकडाऊन काळात दारुच्या नशेत वाहन चालवून आरडाओरडा करत शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी कळे पोलिसांत एकावर आज (शुक्रवार) दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कळे पोलीस ठाण्याने वाहनांची तपासणी सुरू केली आहे. यावेळी संदीप आनंदा नाईक (वय ३४, रा. कुंभारवाडा चौक कळे या वाहनधारकाने दारुच्या नशेत आपली अँपे रिक्षा (एमएच ०९ -बीए -०३८२ बाजारभोगाव ते कळे मुख्य रस्त्यावर दारुच्या नशेत कुंभारवाडा चौकात सार्वजनिक रस्त्यामध्ये रहदारीला अडथळा आणि धोका निर्माण होईल अशा रितीने उभी केली होती.

त्यावेळी पोलीसांनी रस्त्यावरील गाडी काढण्यास सांगत लायसन्सची मागणी केली असता ते दाखवण्यास नकार देत दारुच्या नशेत संदीप नाईक याने पोलिसांशी मोठमोठ्याने हुज्जत घातली. त्यामुळे दारुच्या नशेत शासकीय कामात अडथळा आणि सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी कळे पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.