कळे (प्रतिनिधी) :  शेतजमिनीच्या वादातून पन्हाळा तालुक्यातील वेतवडे येथे हाणामारी झाली. यामध्ये तेरा जणांविरुद्ध कळे पोलीसात तक्रार नोंद झाली आहे. या हाणामारीत आनुबाई हरी दळवी (वय ७०) या जखमी झाल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पन्हाळा तालुक्यातील वेतवडे येथे कृष्णात हरी दळवी आणि पांडुरंग भाऊ दळवी शेजारी राहतात. ते एकमेकांचे भाऊबंद आहेत. शेतजमिनीचा गट नंबर २७९/१ हा २५ वर्षापूर्वी कृष्णात दळवी यांच्या वडिलांनी पांडूरंग दळवी यांच्या वडीलांना कसायला दिला आहे. या गट नंबरची शेती आमची आहे, ती परत मिळावी असे कृष्णात दळवी यांनी सांगितले. या रागातून  शेतातच हाणामारी झाली. यामध्ये कृष्णात दळवी यांच्या आईना मारहाण करण्यात आली.  त्यामध्ये त्यांच्या डोळ्याजवळ भुवईला जखम झाल्याने त्या बेशुद्ध पडल्या. त्यांना तत्काळ सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत कृष्णात दळवी यांनी शंकर दळवी,दत्तात्रय दळवी,पांडुरंग दळवी,अर्चना दळवी,वैशाली दळवी,लक्ष्मी दळवी,आक्काताई दळवी या सात जणांविरुद्ध तक्रार नोंद केली आहे. तर पांडुरंग दळवी यांनी कृष्णात दळवी,हरी दळवी,अनुबाई दळवी,लता दळवी(वेतवडे), सुरेश पाटील (सुळे) ,कृष्णात दळवी यांचा आसुर्ले-पोर्ले येथील जावई अशा सहा जणांविरुद्ध तक्रार नोंद केली आहे.