हालोंडी येथे दोन कुटुंबात मारामारी : तिघांना पोलीस कोठडी

0
116

टोप (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील हालोंडी येथे दोन कुटुंबात जागेच्या वादातून झालेल्या मारहाणीत दोघे जखमी झाले. परस्परा विरोधात शिरोली पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून आज (सोमवार) त्याना कोर्टात हजर केले असता तिघांना चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

हालोंडी (ता. हातकणंगले) येथील वैभव महावीर बेळंके यांची मोठी बहीण मनीषा महावीर पाटील यांच्या नावावर जैन मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या पडीक घराची जागा आहे. यामध्ये साचलेला कचरा वैभव पाटील आणि त्यांचा भाचा अरिहंत पाटील हे मजुरांना घेवून काढत होते. यावेळी तेथे  आरोपी अमोल गुंडा पाटील, संतोष गुंडा पाटील यांनी येऊन ही जागा आमच्या मालकीचे आहे असे सांगून वैभव बेळंके त्यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. तर संतोष पाटील याने लोखंडी सळई घेऊन वैभव बेळंके यांच्या उजव्या हातावर मारहाण करून जखमी केले. तर वैभव यांचा मोठा भाऊ वर्धमान बेळंके भावास मारहाणीतून वाचवण्यासाठी आला असता अमोल पाटील त्याला दगड फेकून मारल्याने तो जखमी झाला असल्याची फिर्याद वैभव बेळंके यांनी दिली आहे.

तर संतोष गुंडा पाटील दिलेल्या तक्रारीत गिरणार दूध संस्थेची व आमच्या वाड्याच्या मधील सामाईक भिंत पाडत असताना संतोष पाटील यांचा भाऊ अमोल यांनी तुमच्या वाटणीची भिंत मोजून घेऊन नंतर पाडा. असे सांगत असताना केवल महावीर पाटील, वर्धमान महावीर बेळंके,  वैभव महावीर बेळंके यानी तुम्ही कोण सांगणार असे सांगत आम्हास शिवीगाळ केली. परंतु आम्ही समजावून घेऊन तुमच्या हिश्याची भिंत घेण्यास आम्हाला काही विरोध नाही. असे सांगत असताना याने चिडून आमच्या अंगावर धावून येऊन आमच्याशी झटापट केली. यात वर्धमान बेळंकी याने अमोल यास धरून केवल पाटील याने लोखंडी पारेणे त्याच्या गुडघ्यावर मारहाण करून गुडघा फॅक्चर केला.

आज या सर्वाना शिरोली पोलिसानी कोर्टात हजर केले असता केवल  पाटील, वर्धमान बेळंके, वैभव बेळंके या तिघांना  चार दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.