कोल्हापूर (प्रतिनिधी) : आज (बुधवार) नवरात्रोत्सवाच्या पाचव्या दिवशी करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची महापूजा ‘गजारूढ’ स्वरुपात बांधण्यात आली.

पंचमीला करवीरनिवासिनी आपल्या लवाजम्यासह त्र्यंबुलीसमोर कोलासूररूपी कोहळा हनन करायला हत्तीवर आरुढ होऊन जाते. त्र्यंबुलीचा रुसवा काढायला म्हणून दर नवरात्रीच्या पंचमीला कोलासूराला कसे मारले, याचे प्रात्यक्षिक दाखवायला आणि त्र्यंबुलीने कसे सर्वांना वाचवले, याचे भक्तांना स्मरण व्हावे म्हणून आपल्या लवाजम्यासह हत्तीवर आरूढ होऊन त्र्यंबुलीला भेटते. आणि तिथेच कुष्मांडबलीचा सोहळा पार पडतो.

 पंचमीची ही पूजा श्री मकरंद मुनिश्वर आणि माधव मुनिश्वर यांनी बांधली.