शेतातल्या ढेकळाने हिमालयाशी तुलना करू नये : अमोल कोल्हे

0
75

पुणे (प्रतिनिधी) : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर टीका करणाऱ्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांवर राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी जोरदार टीका केली आहे. शेतातल्या ढेकळाने हिमालयाशी तुलना करू नये, अशा शब्दांत त्यांनी हल्ला चढवला आहे.

पुणे पदवीधर निवडणुकीच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थित पिंपरी, चिंचवडमध्ये सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अमोल कोल्हे यांनी ही टीका केली. मला भाजपच्या प्रदेशाध्यक्षांवर टीका करायची नाही. पण शेतातल्या ढेकळाने हिमालयाशी तुलना करू नये, तुम्ही निखारा टाकला तर आम्ही वणवा पेटवू, असा इशाराही कोल्हे यांनी दिला. देशात त्यांचा वरचष्मा आहे, असे त्यांना वाटतंय. त्यामुळे त्यांना आता इंगा दाखवण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले.