यड्रावमध्ये शेताला आग : सात एकर ऊस जळून खाक

0
168

शिरोळ (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्यातील यड्रावमध्ये एका ऊसाच्या शेताला काल (सोमवार) रात्रीच्या सुमारास आग लागली. या आगीत सात एकर ऊस जाळून खाक झाला. यड्राव येथील जंगली बाबा पीर परिसरातील प्रकाश पोटे यांच्या शेतामध्ये ही घटना घडली. रात्रीच्या वेळी अचानक आग लागल्याने परिसरात खळबळ माजली. परंतु, ही आग कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही. घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती. रात्री उशिरा पर्यंत आग विजवण्याचे काम सुरू होते.