Published June 3, 2023

कोल्हापूर (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या विविध उपक्रमात सहभागी व्हावे व स्वतःचे व्यक्तिमत्व घडवावे, असे आवाहन मानसशास्त्र अधिविभागाचे प्रमुख प्रा. डॉ. सुभाष कोंबडे यांनी केले.

राष्ट्रीय युवा संसदेत उत्कृष्ट संसदपटू ठरलेल्या मास कम्युनिकेशनची विद्यार्थिनी साईसिमरन घाशी हिचा व युवा संसदेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवणाऱ्या सचिन बनसोडे यांचा प्रा. कोंबडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी एम. ए. मास कम्युनिकेशचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव होते.

यावेळी डॉ. सुमेधा साळुंखे, प्रा. परशराम पवार यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. प्रा.कोंबडे म्हणाले, शिवाजी विद्यापीठात अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात. त्यामध्ये पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला पाहिजे. शिवाय विद्यापीठाच्या चांगल्या उपक्रमांची माहिती विद्यार्थ्यांनी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवली पाहिजे.

September 23, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023