Published September 30, 2020

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कृषी यांत्रिकीकरण उप अभियानांतर्गत अनुदानाचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी आपले अर्ज mahadbtmahait.gov.in या पोर्टलवर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी केले आहे.

शेतकऱ्यांची पोर्टलवर नोंदणी आणि अर्ज सादर करण्याची कार्यपध्दती बाबतची माहिती पोर्टलवर ‘ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी सूचना’या सदराखाली देण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांमधील सर्व कृषी अवजारे निवडीसाठी उपलब्ध राहतील. ट्रॅक्टरसाठी दिनांक १४ जुलै २०२० चे शासन निर्णयानुसार अनुसूचीत जाती, अनुसूचीत जमाती, अल्प व अत्यल्प भूधारक आणि महिला शेतकरी यांना किमतीच्या ५० टक्के किंवा १ लाख २५ हजार यापैकी कमी असेल ती आणि इतर शेतकऱ्यांसाठी किमतीच्या ४० टक्के किंवा रक्कम रुपये १ लाख यापैकी कमी असेल ते अनुदान मर्यादा राहील.

केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त संस्थांकडून तपासणी केलेल्या ट्रॅक्टर, पॉवर टिलर, अवजारांची यादी farmech.dac.gov.in या पोर्टलवर वेळोवेळी अद्ययावत करण्यात येते. या यादीमध्ये समाविष्ठ असलेली किंवा ट्रॅक्टर, पॉवर टिलर वगळता इतर अवजारांच्या बाबतीत केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेकडील वैध तपासणी अहवाल उपलब्ध असलेल्या अवजारांनाच अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेतर्गंत लाभार्थी उद्दिष्ट ऑनलाईन पध्दतीने सरकारच्या mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर देण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी आपल्या तालुक्यातील कृषी सहाय्यक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी अथवा उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी शेतकऱ्यांनी संपर्क साधावा.

September 23, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023