शेतकऱ्याने पेटवला ३० एकरातील भुईमुग

0
43

जुनागड (वृत्तसंस्था) : जुनागडातील माडिया हाटिनाच्या पानिघ्रा इथं राहणाऱ्या एका शेतकऱ्याने ३० एकर जमिनीत भुईमुग लावला होता.  पण, मुसळधार पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालं. त्यामुळे संतापाच्या भरात त्यांनी हाताने लावलेल्या पिकाला पेटवून दिले.

शेतकरी गिरिराज सिंह यांना प्रचंड नुकसानीचा फटका बसला आहे. गिरिराज सिंह यांनी मोठ्या मेहनतीने भुईमुगाचे पिक घेतले होते. पण पावसामुळे ते वाहून गेले. यंदा  मोठ्या आशेनं भुईमुगांचे पिक घेतले होते. पण, पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. सर्व पिक वाया गेले आहे. खतं, पेरणीचा खर्चही हाती आला नाही. आता हे पिक फेकून देण्यासाठी ट्रॅक्टरचे भाडेही परवडणारे नव्हते. त्यामुळे शेतातच पिक बाहेर काढून पेटवून दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here