खेरीवडे येथे गव्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी…

0
308

साळवण (प्रतिनिधी) : खेरीवडे ता. गगनबावडा येथील शेतकरी कृष्णात मारुती पाटील (वय ४०) हे गव्याने केलेल्या हल्ल्यात जखमी झाले. वन विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन त्यांना उपचारासाठी तातडीने कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

आज सकाळी सव्वासहाच्या सुमारास भागाईचा मळा नावाच्या शेतात जनावरांसाठी वैरण आणण्यासाठी गेले होते. पाऊस चालू असल्यामुळे डोक्यावर कागदाची खोळ असल्यामुळे ऊसामध्ये असलेल्या गव्याच्या हालचालीचा अंदाज आला नाही. त्यामुळे गव्याने त्यांना पाठीमागून जोराची धडक मारल्यामुळे ते बांधाच्या खाली पडले. तरी स्वतः प्रसंगावधान राखून जवळच असलेल्या केळीच्या झाडाचा आधार घेऊन त्यांनी स्वतःची सुटका करून घेतली. त्यामुळे शेतकऱ्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच गव्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातून होत आहे.