धामणीखोऱ्यात शेतकऱ्यांचा आधुनिक तंत्राद्वारे पीक घेण्याचा कल…

0
315

कळे (प्रतिनिधी) :  धामणीखोऱ्यात उन्हाळी भात रोप लागणीला वेग आला आहे.  शिवारात शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात धांदल दिसून येत आहे. मात्र, यावेळी शेतकरी आधुनिक तंत्राद्वारे भाताचे पीक घेऊ लागला आहे.

ऊस पीक सलग काही वर्षे घेतल्यानंतर पीकात बदल व्हावा आणि जमिनीचा पोत सुधारावा या उद्देशाने शिवारात अनेक शेतकरी ऊस काढणीनंतर भात पीक घेण्यात व्यस्त आहेत. यासाठी बैलाद्वारे चिखल करण्याचे प्रमाण कमी होत असून रोटरचा वापर वाढल्याचे दिसत आहे. तसेच शेतकरी आधुनिक तंत्राद्वारे भाताचे पीक  घेण्याकडे कल दिसत आहे.