टिकरी बॉर्डरवर शेतकऱ्याची आत्महत्या

0
67

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान आणखी एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. रविवारी टिकरी बॉर्डरवर महापंचायत सुरू होण्याआधी एका शेतकऱ्याने चिठ्ठी लिहून ठेवत आत्महत्या केली. कर्मबीर असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

शेतकरी आंदोलनाला ७४ दिवस झाले असताना सरकारी पातळीवर तोडगा काढण्यासाठी कोणतीही पावले उचलली जात नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या भावना तीव्र होत आहेत. परिणामी याआधीही काही शेतकऱ्यांनी आंदोलनस्थळी आत्महत्या केल्या होत्या. रविवारी टिकरी बॉर्डरवर आंदोलनस्थळी राकेश टिकैत यांच्या उपस्थितीत महापंचायत होणार होती. त्याआधीच तेथे एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. त्यामुळे तेथील वातावावरण बदलून गेले. या शेतकऱ्याने आत्महत्या करण्याआधी चिठ्ठी लिहून ठेवली आहे.